संभाजीनगरातून अपहरण झालेला बिल्डरपुत्र कार अपघातामुळे जालन्यात सापडला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 37 Views 2 Min Read
2 Min Read

अधिकची माहिती अशी की,  संभाजीनगर शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी (दि.5)  रात्री अपहरण करण्यात आल्याच समोर आलं होतं. घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील सेंट्रल मॉलमधून या मुलाचं अपहरण झालं होतं. जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता. दरम्यान, याचवेळी काळ्या रंगाची चारचाकी आली अन् मुलाला वडिलांसमोर उचलून नेले. ही घटना मंगळवारी रात्री 8.40 वाजता सिडको एन-4 मध्ये घडली. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना (Chhatrapati Sambhaji Nagar Crime) यश आलं आहे.

- Advertisement -

जालना जिल्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात. चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांना उचलण्यात पोलिसांनी यश आलंय. विशेष म्हणजे चिमुकला मुलगा अपहरण करण्यात आलेल्या कारचा अपघात झाल्यामुळे सापडलाय.  संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण करण्यात आले होते (Chhatrapati Sambhaji Nagar Crime), त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले आहेत. अपघात झाल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान, या चार आरोपींना संभाजीनगरकडे रवाना करण्यात आले असून मुलगाही सुखरुप आहे.

- Advertisement -

जालना जिल्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण केले त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे आरोपी सापडले आहेत. अपघातामुळे आरोपींना पकडण्यात यश आले आहे. चार आरोपींना घेऊन संभाजीनगरकडे रवाना करण्यात आलंय, तर  मुलगाही सुखरूप असल्याचं समोर आलंय.

- Advertisement -
Share This Article