लातूर जिल्ह्यात आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; जिल्हा हादरला

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 98 Views 1 Min Read
1 Min Read

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलगरा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. करीम इमाम मुल्ला, वय वर्ष ३२, या व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याच्या घटनेने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी आरोपीने बोलवून घेतलं, त्यानंतर चिमुकलीसोबत त्याने नराधमाने कुकर्म केल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने घरातील कुटुंबीयांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नराधमाचा शोध सुरू झाला होता. मात्र पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्याआधीच आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला होता. नागरिकांकडून आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. कलम ६४ (१) ६५ दोन बी एम एस २०२३ सह कलम ४, ८, १२ पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर घृणास्पद कृत्य केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. फरार आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. औराद शहाजाणी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

- Advertisement -
Share This Article