पत्नी-मुलीला संपवून स्वत:चाही शेवट

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 25 Views 1 Min Read
1 Min Read

अधिकची माहिती अशी की, विरारमध्ये एकाच घरात तिघाचे मृतदेह सापडले होते, ही घटना बुधवारी उघडकीस आली होती. आर्थिक विवंचनेला कंटाळून पित्याने आपल्या पत्नीला आणि पाच वर्षाच्या मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली आहे.  उदयकुमार काजवा असं बापाच नाव आहे, तर पत्नीच नाव विना काजवा आणि मुलीच नाव शिवालीका काजवा असं आहे. हे विरार पश्चिम ग्लोबल सिटी येथे मैत्री हाईट्स च्या दहाव्या मजल्यावर रहात होते.

- Advertisement -

उदयकुमार बेरोजगार होता. तर पत्नीला  दुर्धर आजार होता. पत्नी खासगी क्लास चालवून घरखर्च चालवत होती. दोन दिवसापूर्वी लाईट बिल न भरल्याने महावितरणाने लाईट कापली होती. 11 वर्षाचा वेदांत काजवा हा माञ शाळेत गेल्यामुळे तो वाचला. सध्या तिघांचे ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.  बोळींज पोलीस ठाणे मध्ये अदाखल पात्र गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

Share This Article