साताऱ्यात तीन अपघातात चार जण जागीच ठार

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 367 Views 1 Min Read
1 Min Read

सातारा : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावाच्या हद्दीत बंद पडलेल्या कंटेनरला साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यामध्ये कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.  दुसऱ्या एका अपघातात राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोर येथील शेंद्रे गावच्या हद्दीत ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  बस स्टँडच्या समोर झालेल्या भीषण अपघातात एक मोटरसायकल स्वार ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडला. युवकाला दुसऱ्या गाडीचा धक्का लागल्याने तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

 

- Advertisement -

Share This Article