अकोल्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड, साखरझोपेत पत्नी अन् चिमुकलीला संपवलं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 70 Views 2 Min Read
2 Min Read
अकोला: अकोला पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. येथे पतीनेच पत्नीला आणि पोटच्या मुलीला संपवलं आहे. अकोल्यात पतीला सोडून पाच वर्षांपासून माहेरी राहत असलेल्या पत्नीचा आणि ९ वर्षीय मुलीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. २४ एप्रिलला पहाटे ५ वाजताच्या सुमारास अकोला शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पतीनेच पत्नीवर आणि मुलीवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केलं, यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मनीष म्हात्रे (वय ३०) असं मारेकरी पतीचे नाव, तर रश्मी म्हात्रे असं मृतक पत्नीचे आणि माही म्हात्रे असं मृतक मुलीचं नाव आहे.

- Advertisement -

पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात खदखदत होता. पती मनीष म्हात्रे हा अनेकदा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी जात होता. परंतु पत्नी काही नांदायला यायची नाही. दरम्यान, काल म्हात्रे कुटुंबात लग्न असल्याने पत्नी रश्मी आणि मुलगी माही या दोघीही अकोल्यात सासरी आल्या होत्या. २३ एप्रिलच्या रात्री मनीषनं पत्नीला सासरी राहायला म्हटलं, पण पत्नीने नकार दिला. याच रागातून पत्नी आणि पोटची ९ वर्षीय मुलीची गाढ झोपेत असताना त्याने दोघांवर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केली.

- Advertisement -
या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या, या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे करत आहेत.

- Advertisement -
Share This Article