रस्ता ओलांडत असताना बोलेरोची धडक; वडिलांसमोरच लेकीचा अंत

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 9 Views 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली जालना रोडवरील हरिओम नगर मधील रहिवासी गीता अनिल सोळंकी (वय वर्ष ३८) या महिलेचा रस्ता ओलांडांताना अपघात होऊन मृत्यू झाला आहे. स्कुटीला बोलेरो गाडीचा धक्का लागल्याने झालेला अपघातामध्ये तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
३ फेब्रुवारीला दुपारी चार वाजेच्या सुमारास गीता अनिल सोळंकी या बाजारातून आपल्या वडिलांच्या स्कुटीवर मागे बसून त्यांच्या चिखली जालना रोडवरील हरिओम नगरमधील घरी जात होत्या. तेव्हा उजव्या बाजूला असलेल्या घराकडे जाताना रस्ता ओलांडताना पाठीमागून आलेल्या अज्ञात बोलेरो गाडीची धडक त्यांना बसल्याने त्या खाली पडल्या . त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

- Advertisement -

नागरिकांनी त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. परंतु, डॉक्टरांना त्यांना वाचवण्यास यश आले नाही. त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू-सासरे, आई-वडील, दीर, भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहावर त्यांच्या राहते गाव येवता येते ४ फेब्रुवारी रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

Share This Article