नांदेड: नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून नराधम शिक्षकाने गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या शिक्षकाने दिली. त्याचबरोबर तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार केला. अल्पवयीन विद्यार्थींनी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात देखील करण्यात आला.
- Advertisement -
ही माहिती घरच्यांना समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -
विद्यार्थिनी गरोदर राहिली त्यानंतर गर्भपात…
नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीला वारंवार धमक्या देत, तिचा व्हिडिओ व्हायरल (Nanded Crime News) करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार (Nanded Crime News) केले. वारंवार संबंध ठेवल्यानंतर विद्यार्थीनी गरोदर राहिली. त्यानंतर नराधमाने तिचा गर्भपात देखील करायला लावला. दरम्यान घडलेला प्रकार कुटुंबियांना लक्षात आला. यामुळे मुलीला विश्वासात घेऊन विचारले त्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर सर्वांना धक्का बसला. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली.(Nanded Crime News)
- Advertisement -
नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल
संबंधित घटनेची माहिती अल्पवयीन मुलीच्या घरी समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. तर आरोपी शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी, पालकांनी केली आहे.

