ज्येष्ठ नेते किशनराव राठोड यांचे निधन; उद्या होणार अंत्यसंस्कार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 24 Views 1 Min Read
1 Min Read

कमळेवाडी ता. मुखेड येथे होणार अंत्यसंस्कार

- Advertisement -

नांदेड : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार तथा मराठवाड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवणारे कर्मवीर किशनराव राठोड वय ९५ यांचे मंगळवार दि. २२ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता कमळेवाडी ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

- Advertisement -

अंत्यत साधे व्यक्तीमत्व अशी माजी आमदार किशनराव राठोड यांची ओळख सर्वदूर होती. कुटुंबातील अनेक दुर्घटनांचा सामना करीत सर्वांना आधार दिला. आयुष्याची ९५ वर्षे तिघा भावांच्या कुटुंबातील शेकडो सदस्यांची एकत्रित मोट बांधून एकत्रित कुटुंबाचा समाजापुढे आदर्श ठेवला. झोपडीत जन्माला आलेले आणि स्वत: अशिक्षित राहून आपले धाकटे बंधू आमदार कै. गोविंदराव राठोड यांना घेऊन आश्रम शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय केली.

- Advertisement -

गेल्या काही दिवसापासून माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांच्यावर हैद्राबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान मंगळवार दि. २२ रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता कमळेवाडी ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाने मुखेड तालुक्यावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोध व्यक्त केला.

Share This Article