हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाघी सिंगी शिवारामध्ये कोर्टा येथील मेंढपाळांच्या मेंढ्यांना विषारी चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान या मेंढपाळांचे झाले आहे. या घटनेत ४० मेंढ्यांना विषबाधा झाल्याने डॉक्टरांनी मागील दोन दिवसापासून उपचार सुरू केले आहेत. मेंढपाळ विष्णू भाऊराव आव्हाड व नारायण आव्हाड यांनी आपल्या मेंढ्या चारण्यासाठी औंढा तालुक्यातील शिरला शिवारामध्ये ८ डिसेंबर पासून आणलेल्या होत्या.
- Advertisement -
दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर रात्री वाघीशिंगी शिवारात त्या मुक्कामी थांबलेले असताना आणि दिवसभरात विषारी चारा खाल्ल्याने रात्री उशिरा मेंढ्या तडफडत असल्याचं मेंढपाळांच्या लक्षात आले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने व उपचाराची कुठलीच सुविधा नसल्याने ४० मेंढ्या विषबाधेने तडफडत होत्या. जास्त विषबाधा झाल्याने २३ मेंढ्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

