समुद्रातच मच्छीमार बोटीला लागली आग

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 10 Views 1 Min Read
1 Min Read

मच्छीमार बोटीला आग  लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला आहे. या आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली आहे. बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. आज सकाळी ही घटना घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे.  दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणली आहे. सध्या आग विझविण्याचं काम सुरु आहे. साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मदतीला कोस्ट गार्ड व नेवीच्या बोटी मदतीला पोहोचलेल्या असून सर्व खलाशी सुरक्षित आहेत. दरम्यान, समुद्रात अचानक बोटीने पेट घेतल्यामुळं खलाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आगीची माहिती मिळताच स्थानिकांच्या साथीनं बोट समुद्रकिनारी नेण्यात आली आहे.

- Advertisement -

Share This Article