मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेल्या सुर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धचा मालिकेसाठीही तो उपलब्ध नाही. आधीच दुखापत असताना सुर्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीये. सुर्या एका आजाराने ग्रस्त असून यावर उपचार घेण्यासाठी तो परदेशी जाणार असल्याची माहिती समजत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकप आणि आयपीएल तोंडावर असताना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
- Advertisement -
सुर्यकुमार यादव याला हर्नियाचं निदान झाल्याची माहिती समजत आहे. सुर्या आता बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. हर्निया आजारावर उपचार घेण्यासाठी सुर्या जर्मनीमधील म्युनिक येथे जाणार आहे. सुर्यकुमार यादव याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सुर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसण्याची कमीच शक्यता आहे. आयपीएल न खेळल्यामुळे सूर्याचं वर्ल्ड कपमधील संघातील जागेवर प्रश्नचिन्ह आहे.
- Advertisement -