रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मुंबईतून दोघा तरुणांना बेड्या

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 73 Views 1 Min Read
1 Min Read
Two youths arrested from Mumbai for making objectionable posts on Facebook about Rupali Chakankar

मुंबई : महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील “राजकारण महाराष्ट्राचे” या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

आरोपी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली. या दोघांना आज गिरगाव येथील १८ व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
Share This Article