सांगलीत गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या

Team Daily Yashwant
Team Daily Yashwant 19 Views 1 Min Read
1 Min Read

सांगली : मार्च महिना मध्यावर आला की उन्हाळ्याची चाहुल लागते, होळी सणात थंडी जळून जाते अन् उन्हाळा (Summer) सुरू होतो असे जुने-जाणते सांगत असतात. मात्र, अलिकडे तिन्ही ऋतूंमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळते. पावळ्यात पाऊस नक्षत्रानुसार पडतच नाही, तर थंडीच्या 4 महिन्यात थंडीचा तेवढासा प्रभाव दिसून येत नाही. आता, उन्हाळाही लवकरच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकताना दिसून येत असून सांगली (Sangli) जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उष्माघाताच पहिला बळी झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली शहरातील हिराबाग कॉर्नर येथे आईसक्रीम विक्रेत्या व्यक्तीला उष्माघाताने भोवळ आली, त्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाने फेब्रुवारी महिन्यातच पस्तीशी ओलांडली असून सोलापूर व नागपूरमध्ये तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून या रखरखत्या उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या होऊन एका परप्रांतीय गॅरेगार विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना हिराबाग कॉर्नर येथे घडली आहे. हिराबाग कॉर्नर येथील वॉटर हाऊसजवळ रखरखत्या उन्हाचा त्रास होऊन आईस्क्रीम गोळे विकणाऱ्या एका व्यक्तीचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला. रामपाल असे या व्यक्तीचे नाव असून रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहितीसाठी त्यांचा मृतदेह सांगलीतील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

- Advertisement -

Share This Article