अजित पवार थेट अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 19 Views 1 Min Read
1 Min Read

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पण, अजित पवारांचा पुणे दौरा सध्या चर्चेचा विषय ठरलाय, तो म्हणजे त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना  दिलेल्या आव्हानामुळे. काल पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आणि एकेकाळी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अमोल कोल्हेंना थेट आव्हानच दिलं. काल अजित दादांनी आव्हान दिलं आणि आज सकाळीच अजित दादा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांना याबाबत विचारणाही झाली. पण त्यावेळी मात्र ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता.

- Advertisement -

शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करणारच असं ओपन चॅलेंज अजित पवारांनी दिलं आणि आज त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा केला. अजित पवारांनी पुण्यातील हडपसरमध्ये माजंरी पुलाची पाहणी केली. आपला हा दौरा पूर्वनियोजित होता. अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवारांनी दिली. तसेच, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया आली असेल तर त्यांना लखलाभ, मी काल जे सांगितलं तेच फायनल आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

Share This Article