यशोमती ठाकूरही आमच्या संपर्कात, आमदार रवी राणांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 60 Views 1 Min Read
1 Min Read

अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ  तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी  केला आहे. आमदार रवी राणा म्हणाले,  अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहे.  मी या आधी पण सांगितलं होतं की, काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे.  15 फेब्रुवारीला अमित शहा हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. तेव्हा तुम्हाला आणखी मोठे धक्के पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के पाहायला मिळेल, राहिलेले पक्ष सुद्धा खाली होणार आहे.

- Advertisement -

यशोमती ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना रवी राणा म्हणाले,  तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे. मात्र भाजपने त्यांना थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ सुद्धा खाली होणार आहे, असे देखील रवी राणा म्हणाले,

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article