पुणे शहरातील १९ वर्षीय विद्यार्थी इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 18 Views 2 Min Read
2 Min Read

पुणे : महाराष्ट्रात अनेक भागात इसिस मॉड्यूलच्या कारवाया सुरु होत्या. पुणे पोलिसांनी सर्वात प्रथम हा प्रकार उघड केला. एका मोटारसायकल चोरी प्रकरणात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना 18 जुलै रोजी पकडले होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवादी पथकाने केला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास देण्यात आला. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर या शहरापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल अमरावती जिल्ह्यात आले. आता पुणे शहरात इसिस मॉड्यूलच्या संपर्कात आलेल्या एका विद्यार्थ्यास कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

पुण्यात १९ वर्षीय तरूणाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सॅलिसबरी पार्कमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची एनआयएकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. त्याचे मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहे. बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. संबधित तरुणाची कसून चौकशी एनआयएचे पथक करत आहे. विद्यार्थ्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री NIA ने केलेल्या छापेमारीत एका विद्यार्थ्यांला ताब्यात घेण्यात आले. त्या विद्यार्थ्यास अमरावतीला आणले गेले आहे. अमरावतीमध्ये एका ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात त्याची कसून चौकशी NIA कडून सुरु आहे. NIA ने ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असण्याचा संशय NIA ला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीच अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई एनआयएने केली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईत सुरु असलेले इसिस मॉड्यूल आता विदर्भात आल्याचे यामुळे समोर आले आहे.

- Advertisement -

 

Share This Article