मुंबई : आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग वृद्ध प्रवासी रिक्षात विसरला. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने जेव्हा त्याला याची आठवण झाली, तेव्हा त्याला अक्षरशः ब्रह्मांड आठवलं. परंतु पोलिसांच्या कृपेने त्याला त्याचा ऐवज जसाच्या तसा परत मिळाला. तोही अवघ्या काही तासांच्या आत.
- Advertisement -
बोरिवलीतील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी अर्थात MHB कॉलनी पोलिसांनी तासाभरात आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग शोधून काढली. रिक्षात आपली बॅग विसरुन गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांना माहिती दिली. त्यानंतर ते रिक्षाचा माग काढण्यात आणि मौल्यवान वस्तू परत मिळवण्यात यशस्वी झाले.
- Advertisement -
सत्तर वर्षीय भारत आरते हे त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभानंतर रिक्षामधून परत येत होते. त्यांच्या बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र रिक्षातून उतरताना ते नेमके ती बॅग काढायलाच विसरले. बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कार्यवाही केली.

