कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 28 Views 1 Min Read
1 Min Read

‘कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने वाढविले आहे. सहकार मंत्री म्हणून निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी कांदा उत्पादकाची बाजू मांडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.’’ असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मंचर (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (ता.२१) झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. निर्यात होणा-या कांद्यावर केंद्र सरकारने भरमसाठ शुल्क आकारल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे.

- Advertisement -

या प्रश्नाविषयी बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘‘कांदा उत्पादक शेतकरी गेल्या दोन वर्षापासून अडचणीत आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने लागू केलेले निर्यात शुल्क रद्द झाले पाहिजे. याबाबत आग्रही धोरण राज्य सरकारचे असणार आहे. त्यासाठी केंद्रसरकार बरोबर बोलणी करून कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका असेल.’’

- Advertisement -

Share This Article