कार दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू, नवऱ्यानं स्वत:विरोधात दाखल केला गुन्हा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 18 Views 2 Min Read
2 Min Read

गुजरातमधील एक आश्चर्यचकीत करणारे प्रकरण समोर आलेय. एका व्यक्तीनं स्वत:विरोधातच गुन्हा दाखल केलाय. नर्मदा जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरु आहे. झालं असं की, कार दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर दु:खी झालेल्या नवऱ्यानं पोलिस स्टेशनमध्ये स्वत:विरोधातच गुन्हा दाखल केलाय. त्या व्यक्तीचं नाव परेश दोशी असं आहे.

- Advertisement -

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, गाडी चालवताना माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे श्वानाला धडकणारी कार अचानक वळवली, त्यामुळे डिव्हायडरला धडकली. त्यामुळे पत्नीचं निधन झालं. माझ्या चुकीमुळे पत्नीचं निधन झालं. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करतोय, असे 55 वर्षीय परेश दोशी यांनी पोलिसांना सांगितलेय.  दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणाचा तपास सुरु झालाय.

- Advertisement -

प्रकरण काय आहे ?

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, परेश दोशी यांनी पोलिसांना सांगितलं की, ते पत्नी अमितासोबत रविवारी सकाळी अंबाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर घरी येत असताना साबरकांडा येथे  खेरोज-खेडब्रह्मा राज्य महामार्गावर दान महुदी गावांजवळ एक श्वान गाडीच्या समोर आला. त्यामुळे लक्ष विचलीत झालं. त्या श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला आणि पोलला धडकली.

- Advertisement -

कार ऑटो लॉक झाली अन्…. 

गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे डिव्हायरला धडकली. त्यानंतर कारचा दरवाजा ऑटो लॉक झाला. त्यामुळे दोघेही गाडीतच अडकले, असे दोशी यांनी पोलिसांना सांगितलं. अपघात झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांनी दोशी दाम्पत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही जणांनी गाडीच्या दरवाजाची काच फोडून दोघांनाही बाहेर काढले, असे दोशी यांनी सांगितलं.

स्वत:वरच गुन्हा दाखल केला – 

दरम्यान, गाडीची काच फोडून दोघांनाही बाहेर काढण्यात आलं. पण रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. पण पत्नीचं निधन झालं. याप्रकरणी दोशी यांनी स्वत:वरच गुन्हा दाखल केलाय. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघाताची नर्मदा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Share This Article