वाशिममध्ये रंगला गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 13 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • शेतकऱ्याचा अनोखा संदेश देण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

वाशिम : मातृत्व ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. एखादी महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड कौतुक करतात. ग्रामीण भागात गाईला, म्हशीला अगदी घरतील व्यक्ती असल्यासारखी वागणूक मिळते. हौसेपोटी लोक काय करतील याचा नेम नाही, याचंच एक उदाहरण समोर आलंय. वाशिममध्ये  एका शेतकऱ्यानं चक्क आपल्या गाईचं डोहाळे जेवण घातलं आहे.गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला. सोयऱ्यासह गावकरी देखील मोठ्या उत्साहात या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा विषय आता चर्चेचा विषय बनला. हिंदू धर्मात तर गाईला अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्या घरी असलेल्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशिमच्या निरखी कुटुंबियाने चक्क गायीचे डोहाळे विधीचा कार्यक्रम पार पाडला.

- Advertisement -

वाशिमच्या देवपेठ भागात निरखी कुटुंबाच्या घरासमोर असलेला मांडव अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.  गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला अन् ओटीपूजन केले. आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यात आले. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला परिसरात चांगलीच चर्चा आहे. कुटुंबात गाईने दिलेल्या वासराला (पिल्लाला)  घरच्या मंडळीने  लाडाचे नाव नंदनी अस नाव दिलं. तीन वर्षांची आपली लाडकी नंदनी गाय ही काही महिन्यांपूर्वी गर्भवती राहिली आहे.  याची आनंदवार्ता कुटुंबात कळताच कुटुंबियाने डोहाळे विधी करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

फुलांची सजावट

सातवा महिना पूर्ण केलेल्या महिलेल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण केले. डोहाळे जेवणाला मिष्टान्न म्हणून जिलबी आणि रसमालाई, पापड, भजे यासह पाणीपुरी  अन्य  जेवण  ही येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलं होते.   बच्चे कंपनीने नंदनी  गाई सोबत सेल्फी ही घेतली. आरती झाली गाणी गायली. गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची सजावट करण्यात येते त्या प्रमाणे नंदिनी गायी।ला सजवले. नंतर  गाईची  ओटी  महिलांनी भरली.

- Advertisement -

हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण महत्व आहे गाईच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. धर्म शास्त्र असो की विज्ञान या मध्ये गाई बद्दल आरोग्य आणि  भूतलावर गायीच महत्व  सांगण्यात आले. गाय वाचवण्यासाठी समाजात एक संदेश  देण्यासाठी निरखी कुटुंबियांनी साजरा केलेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा समाजात गाय वाचवण्यासाठी एक सकारात्मक प्रयत्न म्हणावा लागेल.

Share This Article