विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 32 Views 1 Min Read
1 Min Read

गडचिरोली: विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या भागात येऊन आम्हाला शिव्या देतात. काय नाही ते बोलतात. त्यांना हवे तितके बोलू द्या. येत्या ४ जूननंतर तेदेखील भाजपमध्ये येणार, असा दावा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गुरुवारी आलापल्लीत जाहीर सभा घेण्यात आली. यात ते बोलत होते. आत्राम म्हणाले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी केली. पण, विरोधी पक्षनेत्यांनी ही दारूबंदी उठविली. त्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होते. दारू, गुटखा, रेतीतस्करी सुरू आहे. हे सारे कुणाचे आहे, असा सवालही आत्राम यांनी केला.

- Advertisement -

‘माझा कुठला व्यवसाय, एजन्सी नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. वेळप्रसंगी मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूरचे पालकमंत्रिपद सोडेन मात्र गडचिरोलीचे पद सोडणार नाही’, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

‘मी भाजपमध्ये प्रवेश करणार असे आत्राम सांगत आहेत. भाजपच्या पुढे वाकून मुजरा करणाऱ्या राजाला स्वाभिमान काय माहिती? मी दलित, शोषित, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे’, असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

Share This Article