विदर्भ, मराठवाड्यात पुढील 48 तास पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 9 Views 2 Min Read
2 Min Read

चक्रीवादळामुळे  राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तास राज्यासह देशात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्याच्या हवामानावर देखील दिसून येणार आहे. 7 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

48 तासांत विजांच्या गडगडाटासह पाऊस

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाड्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 48 तासांत अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 ते 9 डिसेंबर दरम्यान पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. तर 5 आणि 7 डिसेंबरला  तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. पुढील 24 तासांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 8 ते 9 डिसेंबरला हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

मुंबईसह कोकणात कोरडं हवामान 

पुढील पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. थंडीची प्रतीक्षा कायम राहणार आहे. पुढील पाच दिवस वातावरणात जास्त बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळाचं संकट, अवकाळी पावसाचा तडाखा

तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळलं आणि कमकुवत झालं. चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील बापटलापासून 25 किमी पश्चिम-वायव्येस आणि ओंगोलच्या 60 किमी उत्तर-ईशान्येस दक्षिण किनारपट्टी भागात धडकलं. चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकत असून पुढील काही तासात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्‍यावरील तीव्र चक्रीवादळ मिचॉन्ग गेल्या 06 तासांत 10 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं आहे.

Share This Article