ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 34 Views 2 Min Read
2 Min Read

मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या जवळपास वर्षभर त्या वयोमानानुसार आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

- Advertisement -

त्यांनी शाळेत असल्यापासूनच नृत्याची आवड जोपासली. कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजींच्या यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्या गाणं गायच्या. गाणं आणि नृत्याची आवड यामुळेच त्यांची सिनेविश्वाकडे ओढ अधिक होती. मात्र सारस्वत गौड समाजातील मुली-महिलांनी गाणे-बजावणे करणे त्यावेळी अपराध मानला जायचा. मात्र त्यांनी तरीही मागे वळून पाहिले नाही. सीमा देव हे मराठी नाव हिंदी सिनेसृष्टीतही गाजवले.

- Advertisement -

सीमा यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांची संख्या ऐंशीच्या घरात आहे. १९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी परंतु संस्मरणीय आहे.

Share This Article