अवकाळी पावसानं पुण्याला झोडपलं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 5 Views 2 Min Read
2 Min Read

पुणे : शिरूर तालुक्यातील बेट भागात अवकाळी पावसाकने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या गारपिटीमुळे वाया गेली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

शिरूर तालुक्यात असणाऱ्या बेट भागामध्ये आज सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. बघता बघता पावसाने उग्र रूप धारण केले.अचानक वादळी वारे आणि गारांसह जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली. यामधे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून डांळीब बाग, कांदा रोपे, भाजीपाला पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी कांदा लावगडीसाठी रोपाची तयारी करीत होते, ही रोपे पूर्णपणे गारांच्या मारामुळे भुईसपाट झाली आहेत.

- Advertisement -

मोठी मेहनत करून फुलवलेल्या डांळिंबाच्या कळ्यांचा सडा जमिनीवर पडला आहे . टाकळी हाजी , कुंड परीसर, सोदक वस्ती, रोहीलेवाडी, माळवाडी परीसरात गारांचा वेग मोठ्या प्रमानात होता प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असुन शेतीचे सर्रास पंचनामे करून बेटभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवानेते राजेंद्रदादा गावडे यांनी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास गारपीटीमुळे निसर्गाने हिराऊन घेतला असून, कांद्यांचे गेली दोन वर्ष होत असलेले नुकसान या मुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याला या निसर्गाच्या तडाक्याने जबर धक्का बसला आहे. या बाबत उपविभागीय प्रांत अधिकारी स्नेहल देवकाते – किसवे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मंडल अधिकारी तलाठी यांना दिले आहेत.

- Advertisement -

आमच्या हातातोंडाशीआलेले पीक या अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे. आमचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे. त्यामुळे आम्हाला भरपाई मिळावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी संजय बारहाते यांनी केली आहे.

Share This Article