तुकोबा, श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाच्या सेवेचा मानकरी ठरलेल्या बैलाचा अपघाती मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 2 Min Read
2 Min Read

पुणे : पौड तालुक्यात मानाच्या बैलाला भरधाव वेगाने येणार्‍या सिमेंट मिक्सरने  जोरदार धडक दिल्याने  बैलाचा जागी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली आहे.  वाहन चालकाने थेट  बैलाला धडक दिल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मालकाने जिवापाड जपलेल्या बैलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने मालकाने हंबरडा फोडला.

- Advertisement -

पुण्याच्या पौड तालुक्यातील भूकुम गावात सायंकाळी हा अपघात झालाय. मोती नावाच्या बैलाला संत तुकाराम महाराजांच्या आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मान ही मिळाला होता. भविष्यात पुन्हा एकदा हा मान मिळवण्यासाठी मोतीकडून सराव करून घेतला जातो. सोमवारी सायंकाळी ही हाच सराव सुरू होता. चांदणी चौकाकडून पौडच्या दिशेने सिमेंट मिक्सर निघाले होते. मात्र त्याचवेळी चालकाचा ताबा सुटला अन् पुढे निघालेल्या बैलगाडीला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात मोतीचा जागीच मृत्यू झालाय. बैलाच्या मृत्यूची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली होती त्यामुळं भुकुम गावासह वारकरी संप्रदाय आणि गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

पालखीच्या सोहळ्यासाठी बैलाची निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांची पाहणी करून या निकषांनुसार बैल जोडी निवडली जाते.  पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात  येतात. पालखी सोहळा आषाढ महिन्यात असतो. परंतु त्यासाठी तयारी  सुरू करण्यात येते. या सोहळ्याचा मान मिळावा यासाठी बैलाचा सराव सुरू होता. बैलजोडी मालकांच्या बैलजोडीला पालखी रथाला ओढण्याची सेवा करण्याची संधी मिळावी ही अनेकांची इच्छा  असते. मात्र मानाच्या बैलाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

Share This Article