पहिले ‘रविदास विद्यापीठ’ स्थापन करणार : खर्गे

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 24 Views 1 Min Read
1 Min Read

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी सागर येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान आणि भाजपवर हल्लाबोल केला. यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी सागर येथे संत रविदासांच्या नावाने देशातील पहिले ‘रविदास विद्यापीठ’ स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना फक्त निवडणुकीसाठी रविदासजींची आठवण येत आहे. त्यांचा उद्देश संत रविदास यांचे मंदिर बांधण्याचे नसून मतदान मिळवण्याचा आहे. त्यांना मागील ९ वर्षात याची आठवण झाली नाही, असे ते म्हणाले. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास सागरमध्ये संत रविदासांच्या नावाने विद्यापीठ सुरू केले जाईल. रेशन आणि इतर गोष्टी महत्वाच्या नसून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संविधान आम्ही दिला आहे. या लोकांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असून कारण असल्याशिवाय हे कोणाचेही नाव सुद्धा घेत नाहीत, असा टोला खर्गे यांनी भाजपाला लगावला.

- Advertisement -

लघवीच्या घटनेचा संदर्भ देत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आदिवासींच्या चेहऱ्यावर लघवी करणारे लोक कोणत्या पक्षाचे आहेत. त्यांची पाप धुण्यासाठी ते त्याचे पाय धुतात. चौहान पाय धुत असल्याचे तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल. येथे दलितांची घरे फोडण्यात आली आहेत, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

Share This Article