जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमक्यांना कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 33 Views 1 Min Read
1 Min Read

अंबाजोगाई- जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमक्यांना कंटाळलेल्या एका तरुणाने बुधवारी (ता.३०) येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.  किशोर सीताराम झिंझुर्डे (वय ३०, रा. कवटळी, ता. परळी) असे या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करीत असतानाच परिसरातील वकील, स्टॅम्प विक्रेते यांनी त्यास तत्काळ थांबवले. त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

घटनेची माहिती शहर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. परळी तालुक्यातील कवटळी येथे विहिरीवर पाणी आणण्याच्या कारणावरून २०२१ मध्ये किशोर आणि सुधाकर झिंजुर्डे यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण झाल्याची घटना घडली होती.

- Advertisement -

त्यानंतर सुधाकर झिंजुर्डे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरील तरुणास धमक्या दिल्या जात असल्याचे किशोर झिंझुर्डे याची तक्रार आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासन आपणास कुठलीच मदत करत नसल्याचा आरोप या तरुणाने केला.

- Advertisement -

Share This Article