शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल 10 जानेवारीला लागणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 12 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह  16 आमदारांच्या अपात्रेचा निकालाचा मुहूर्त ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 जानेवारीला  बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता आहे.   विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10  जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य  होते. (MLA Disqualification)

- Advertisement -

विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहे. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article