विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत संपवली जीवनयात्रा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 2 Min Read
2 Min Read

यवतमाळ :  येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय  येथील एका एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव असून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काल, 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मृत विद्यार्थिनी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकले नाही.  या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

मृत विद्यार्थिनी सुहानी ढोले ही यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. मात्र तिने हे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा का संपवली, या बाबत अद्याप कुठलीही माहिती कळू शकलेली नाही. या प्रकरणाचा तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन पानाचे पत्र आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पत्रात मृत विद्यार्थिनीने नेमके काय लिहले आहे, हे अद्याप कळू शकले नाही. तसेच मेडिकल कॉलेज प्रशासन देखील या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे कारण काळू शकले नाही.  यवतमाळ शहर पोलिसांनी या प्रकरणा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरु असून आत्महत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही महिन्यांपूर्वी यांच कॉलज मधल्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालय दोन डॉक्टरांवर एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकजण थोडक्यात बचावला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या रुग्णाला अटक केली.  त्यामुळे आता पुन्हा एक शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली असून अनेक प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

Share This Article