दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारने मंत्रालयातच उभारली वॅार रुम

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 39 Views 2 Min Read
2 Min Read

 राज्यातील   बहुतांश भागात यंदा तुरळकच पाऊस पडला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या  झळा बसू लागल्यात. पेरणी करुन अडीच महिने उलटले. पण पिकांसाठी पोषक असलेल्या पावसाचा अजून पत्ताच नाही. पिके करपू लागली आहे त्यामुळे बळीराजावर आता संकटांचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर  राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम करण्याचा राज्य सरकारने निर्णय  घेतला आहे.

- Advertisement -

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांची वॅार रुम आहे. मंत्रालयातील वॅार रुममध्येच दुष्काळ नियंत्रण वॅार रुम  बनवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वॅार रुममधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस  वॅार रुमचा आढावा  घेणार आहे.  दुष्काळाच्या उंबरठयावर असेलली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यांवर नजर ठेवली जाणार आहे.  दुष्काळाच्या उंबरठयावर असलेल्या  गाव,तालुके,जिल्हे, विभाग वॅार रुमशी जोडले जाणार आहेत.  दुष्काळाच्या उंबरठयावर असलेल्या  गाव, तालुके, जिल्हे, विभाग यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी  उपाय योजना केल्या जाणार आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने  उचलले मोठे पाऊल

राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते यामुळे राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले  आहे. विशेष अधिकारी नेमण्यात येणार असून ते अधिकारी  आढावा घेणार आणि त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणते राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार  आहे. नुकतच राज्य सरकारने धरणातील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते  यानुसार उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता आरक्षित केला जाणार

- Advertisement -

2015 साली वॅाररुमची स्थापना

राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये या वॅाररुमची स्थापना केली. या वॅार रुमच्या  माध्यमातून समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची काम यासारख्या पन्नासहून अधिक प्रोजेक्टचा आढावा याच वॅार रुममधून  मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळाला.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरेंनी याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केला. आता सत्तांतर  झाल्यानंतर पुन्हा एकदा वॉररुम हे नाव कायम ठेवण्यात आलंय.

Share This Article