पुण्यात कार्यक्रम पालिकेचा, पण चर्चा मिसेस पवारांच्या बॅनरची

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 37 Views 2 Min Read
2 Min Read

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा असून शहरात विविध कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी पहिला कार्यक्रम पुण्यातल्या वारजे भागात पार पडला. या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. दरम्यान, हा पुणे प्रशासनाचा कार्यक्रम असून कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली होती. दरम्यान, या कार्यक्रमासाठी लागलेल्या बॅनरमध्ये एका बॅनरची चर्चा ही सर्वाधिक होऊ लागलेली आहे. ते म्हणजे सुनेत्रा पवार यांचं बॅनर. पालिका प्रशासनाचा कार्यक्रम सुनेत्रा पवार यांचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले होते. परंतु प्रत्यक्षात सुनेत्रा पवार या कार्यक्रमसाठी अनुपस्थित होत्या.

- Advertisement -

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात, यावर्षी प्रथमच नणंद विरुद्ध भावजाय अशी घरातच लढत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. काल शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांचं बॅनर आणि दौऱ्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय विरोधक म्हणून बॅनर बाजी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला.

- Advertisement -

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आमदार भीमराव अण्णा तपकीर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

पुण्यात आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रथमच सुनेत्रा पवार यांचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमात सुनेत्रा पवारही व्यासपीठावर दिसणार का, अशी चर्चा होती. मात्र त्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या नाहीत. तरी चर्चा मात्र त्यांच्याच बॅनरची होती.

Share This Article