इंडिया आघाडीची चक्रीवादळामुळे रद्द झालेली बैठक आता 7 डिसेंबरला होणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 17 Views 2 Min Read
2 Min Read

विरोधी पक्षांच्यां इंडिया आघाडीची बैठक आता 17 डिसंबरला होणार आहे. आज 6 डिसेंबरला होणारी इंडिया आघाडीची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता पुढच्या आठवड्यात होणार आहे. मिचाँग चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) इंडिया आघाडीची बुधवारी होणारी दिल्लीतील बैठक (I.N.D.I.A Alliance Meeting) रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.  होती. मात्र, विरोधी पक्षांच्या आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

इंडिया आघाडीची आजची बैठक रद्द

भाजप सरकार विरोधात एकत्र येत विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. पण, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांचा हिरमोड झाल्याचं म्हटलं जात आहे. या निकालातील भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालं आहे. ममता बँनर्जी आणि नितीश कुमार या बैठकीला अनुपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तामिळनाडूचे स्टॅलिनही गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक आता 17 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी नवी दिल्लीत 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली असून त्यात विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीला मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरी, त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलं आहे.

- Advertisement -

Share This Article