अयोध्येतील भव्य राम मंदिरात विधीवत विराजमान झाल्यानंतर गर्भगृहातून प्रभू श्रीरामाचं पहिली झलक…

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 13 Views 1 Min Read
1 Min Read

अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज दुपारी 12.29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली. देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांच्या कृत कृत्य झाल्याच्या भावना झाल्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांच्या झाल्या. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.

- Advertisement -

Share This Article