दहशतवादी हाफिज भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 14 Views 1 Min Read
1 Min Read

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या  मुख्य सूत्रधार हाफिज सईद याचा निकटवर्तीय हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. भुट्टावी यानेच अजमल कसाब  आणि इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षित केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने भुट्टावीच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

29 मे 2023 रोजी दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला, परंतु संयुक्त राष्ट्रांनी आता अधिकृतपणे आपल्या वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे. पंजाब प्रांतात पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा भुट्टावी हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (JuD) आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक होता. JuD ही लष्कर-ए-तैयबाची प्रमुख दहशतवादी संघटना आहे. भुट्टावीच्या मृत्यूनंतर, जमातशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले होते की, 77 वर्षीय भुट्टावी दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात ऑक्टोबर 2019 पासून लाहोरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखूपुरा जिल्हा कारागृहात कैद होता. 29 मे रोजी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने भुट्टावीला रुग्णालयात नेण्यात आले.रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

Share This Article