मिरज सोलापूर हायवेवर भीषण अपघात

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 28 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • दहा जण गंभीर
  • चार ऊसतोड कामगारांवर काळाचा घाला

सोलापूर : मिरजेत भीषण अपघात झाला असून अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहाजण गंभीर जखमी आहेत. ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतत काही मजुरांना ट्रकनं धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

ऊसतोडणीचं काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकनं धडक दिली. तालुक्यातील ऊसतोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत. मृतांमधील तीनजण चिखलगीचे, तर एकजण शिरनांदगीचा रहिवाशी आहे.

- Advertisement -

सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं, येथील काही ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे परतत होते. त्यावेळी मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकनं मागू येऊन धडक दिली.

- Advertisement -

मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय 30 रा. शिरनांदगी, जगमा तम्मा हेगडे वय 35, दादा आप्पा ऐवळे वय 17, निलाबाई परशुराम ऐवळे वय 3 रा. चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि 11 जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.या अपघाताची वृत्त समजतात चिक्कलगी किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली आहे.

Share This Article