तेजस ठाकरे यांच्या टीमने एक नव्या प्रजातीचा साप शोधला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 26 Views 2 Min Read
2 Min Read

तेजस ठाकरे तसेच ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्शिल पटेल यांनी पश्चिम घाटात संशोधनादरम्यान सापाची ही नवी प्रजाती शोधून काढली. पश्चिम घाटाच्या निसर्गात तेजस ठाकरे आणि टीमने सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तसेच, आढळून आलेल्या या नव्या प्रजातीला ‘सह्याद्रीओफिस’ असे नाव देण्यात आले आहे. या सापाच्या प्रजातीसंदर्भातील शोधनिबंध नॅशनल हिस्ट्री म्युझियम, लंडन आणि मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, जर्मनी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

- Advertisement -

तेजस ठाकरे अनेक जंगलांत भ्रमंती करून निसर्गाच्या जैवविविधतेतील नावीन्य शोधण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. याआधीही त्यांनी खेकडे, मासे, पाली अशा ११ हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला असून त्यांचे नामकरणही केले आहे. ओळख नसलेल्या या नव्या प्रजातींना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली आहे. सिंधुदुर्गमधील आंबोलीच्या हिरण्यकेशी येथे आढळणारा मनमोहक सोनेरी ‘देवाचा मासा’ संवर्धनासाठी तेजस ठाकरे यांनी संवर्धन मोहीमही सुरू केली आहे. दरम्यान, यामध्ये आता पश्चिम घाटातील आणखी एक सापाची नवी प्रजाती तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने शोधून काढली आहे.

- Advertisement -

नावामागील कारण काय?

नव्याने ओळखल्या गेलेल्या या वंशाला ‘सह्याद्रीओफिस’ असे नाव देण्यात आले आहे. पश्चिम घाटासाठी वापरला जाणारा ‘सह्याद्री’ हा संस्कृत शब्द आणि ‘ओफिस’ म्हणजे सापासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द विलीन करून हे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीला ‘उत्तराघाटी’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यात ‘उत्तरा’ म्हणजे ‘उत्तर दिशा दर्शविणारी’ आणि ‘घाटी’ हा पर्वत/घाटातील रहिवास अशा संदर्भातून आलेला शब्द आहे. हे नामकरण प्रजातींचे घाटातील उत्तरेकडे असलेला निवास दर्शवते.

- Advertisement -

विशेष म्हणजे, बेडडोमचा कीलबॅक देखील नव्याने प्रस्तावित वंशांमध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे. आता तो मध्य आणि दक्षिण पश्चिम घाटापर्यंत मर्यादित आहे, असं तेजस ठाकरे यांनी सांगितलं. हा अभ्यास आपल्याला घाटांच्या जैवविविधतेबद्दल समजून घेण्यास हातभार लावतो. हे क्षेत्र मानवजातीसाठी अद्याप रहस्यमय असल्याचं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊण्डेशनने म्हटलं आहे.

Share This Article