मराठा आरक्षणावर उद्या ‘सर्वोच्च’ निर्णय? राज्याचे लक्ष दिल्लीत

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 3 Views 1 Min Read
1 Min Read

राज्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आता राज्यभरात सभा घेत आहेत. त्याचवेळी ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध करत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे केंद्र बुधवारी ६ डिसेंबर रोजी दिल्ली ठरणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुपारी दीड वाजता ही याचिका सुनावणीस येणार आहे. या सुनावणीमध्ये जयश्री पाटील विरोधक आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article