अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 29 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • राज्याच्या सत्तेत येताच अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.

पुणे  : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची (Parth Pawar)  वर्णी लागण्याची शक्यता आहे.  कालच अजित पवारांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा 32 वर्षांनी राजीनामा दिला . त्यानंतर अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हे गेल्या 32 वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

पार्थ पवारांसाठी संधी

राज्याच्या सत्तेत येताच अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांचे दोन्ही मुलं राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पार्थ पवार यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र जय पवार राजकारणात सक्रिय नव्हते. आता अजित पवार सत्तेत (Parth pawar and jay pawar) आल्याने वडिलांच्या मागे दोन्ही मुलं राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होऊ पाहत आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे संचालक पद हे पार्थ पवारांसाठी संधी असणार आहे.

- Advertisement -

देशातील नंबर 1 ची बँक

मागील 32 वर्षांपासून अजित पवार जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी कार्यरत होते. 1991 पासून त्यांनी या बॅंकेच्या संचालकपदाची धुरा हाती घेतली होती. त्यांनी या बॅंकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती केली. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर 1 ची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात आणि पुण्यातील बँकेच्या क्षेत्रात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार 1991 पासून संचालकपदी कार्यरत आहे. त्यावेळी बॅंकेचा व्यावसाय एकूण 558 कोटी होता. त्यानंतर अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचा कारभार सुरु झाला आणि व्यावसायातदेखील भर पडली. टप्प्याटप्प्याने या व्यावसायात वाढ झाली आहे.  20 हजार 714 कोटी आजचा बॅंकेचा व्यावसाय आहे.देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांक पुणे जिल्हा बॅंकेचा आहे. यापुढेही ही बॅंक अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असं बॅंकेकडून सांगण्यात आलं आहे.

Share This Article