शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसनं नाहीतर, देवेंद्र फडणवीसांनी काढावा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 65 Views 2 Min Read
2 Min Read

अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणायचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी केलं. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारयांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा, यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा, शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा? शरद पवार महाविकास आघाडीसोबतच आहेत, असा ठाम विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, “काँग्रेसनं शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काढावा. यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी याचा अर्थ काढावा. शरद पवार बोलत असतील तर याचा अर्थ आम्ही का काढावा? शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. भाजपनं राजकारण सडवलंय. जनतेचा विश्वासघात या सर्वांनी केलेला आहे. यांची जागा वेळेप्रसंगी जनता दाखवेलच. महाविकास आघाडी म्हणून जे आमच्यासोबत आहेत, ते आमच्यासोबत आहेत.”

- Advertisement -

“शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, हे जाहीररीत्या सांगावं”, असं वडेट्टीवार म्हणाले. “प्रत्येक पक्षाला आपापल्या परीनं तयारी करावी लागते. निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की, शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते. त्यासाठी प्रत्येक पक्षाला रणनिती तयार ठेवावी लागते.”, असं वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

“शरद पवार यांच्या वक्तव्यानं आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आमच्या सोबत अनेक आघाड्या आहेत. शरद पवारांसह इतरही अनेक आघाड्या आहेत. इंडिया आघाडीच्या पाठीमागे जनता उभी आहे. या सरकारची लोकप्रियता संपली आहे, हे सरकार ED, CBI च्या जोरावर चालणारं सरकार आहे.”, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Share This Article