बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 5 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • टीम इंडियाकडून आशिया कपमध्ये खेळत आई-वडिलांच स्वप्न पूर्ण करणार

बीड: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या निवडीने आनंद व्यक्त केला जात आहे. सचिन धस बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावातील रहिवासी आहे.

- Advertisement -

दुबईच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघ अंडर-19 आशिया कपचा गतविजेता आहे. तसेच भारतीय संघाने अंडर-19 मध्ये सर्वाधिक ८ ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. उदय सहारन (कर्णधार),सचिन धस, अर्शिन कुलकर्णी,आदर्श सिंह, रुद्र पटेल, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी. अशी भारतीय संघातील खेळाडूची नावे आहेत.

- Advertisement -

सचिनचे वडील संजय घस हे चांगले क्रिकेटर व आरोग्य विभागात तर आई सुरेखा धस या पोलिस अधिकारी आहेत. क्रिकेटप्रेमापोटी संजय यांनी मुलाचे नाव सचिन धस ठेवले. त्याला क्रिकेटर म्हणून भारतीय संघात पाहायचे हेच स्वप्न ठेवून आईवडिलांनी त्याच्या हातात लहानपणी खेळणी म्हणूनही इतर काही न देता बॅटच दिली. आज त्याच सचिनने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दुबईत होणाऱ्या आशिया कपसाठी भारताच्या १९ वर्षे वयोगटात संघात स्थान निश्चित केले आहे. स्फोटक फलंदाज अशी सचिनची ओळख आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याला खेळावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. त्याच्या भारतीय संघातील निवडीनंतर आई वडिलांना आनंद होत आहे. त्याला भारताच्या मुख्य क्रिकेट संघातून देशासाठी खेळताना पाहायचे आहे अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

Share This Article