पीकविम्यात तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 2 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : ‘एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला असूत आता पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे की काय, अशी शंका मला येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारने आठ हजार कोटी रुपये विम्याच्या बोडक्यावर घातले आहेत,’ असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला.

- Advertisement -

हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपल्या शरीराचे अवयव विक्रीला काढले असून त्यांची किडनी, लीव्हर, डोळे सरकारने विकत घेऊन कर्जमाफी करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हे आरोप केले.

- Advertisement -

‘पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे का, अशी शंका मला येत आहे. कारण एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारने आठ हजार कोटी रुपये विम्याच्या बोडक्यावर घातले आहेत. एवढे करून विमा कंपन्यांची कार्यालये बंद आहेत. त्यांच्याकडे कोणी फोन घेत नाही, कुणी कुणाला दाद देत नाहीत. ते सरकारचे ऐकत नाहीत आणि शेतकऱ्यांना सामोरे जात नाहीत. त्यामुळे हा पैसा त्या कंपन्यांच्या नावाने कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घेतला पाहिजे. हा पैसा करदात्यांचा पैसा आहे. शेतकऱ्यांना किती पैशांची मदत मिळाली पाहिजे आणि किती रुपयांचे चेक मिळत आहेत ते पाहिले पाहिजे,’ असेही उद्धव म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाली असताना दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्याची धुणीभांडी करायला जाणारे लोक राज्यकारभार करायला नालायक असल्याचे मी म्हणालो आणि तो शब्द त्यांना लागला. त्यावरून त्यांना काय करायचे ते करावे; परंतु मी नागरिकांना विचारतो की, या शेतकऱ्यांवर अवयवविक्री करण्यापर्यंतची वेळ आली मग राज्यकारभार करणाऱ्यांना काय म्हणायचे? – उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख

Share This Article