मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत दाखल

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 8 Views 1 Min Read
1 Min Read

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्शभुमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज केंद्रिय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी दिसुन येत आहेत.

- Advertisement -

सोबतच, कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजेंना माहिती असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली होतांना दिसत आहे. आज (२८ नोव्हेंबर) रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहेत.

- Advertisement -

Share This Article