रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 121 Views 4 Min Read
4 Min Read

अभिनेता रितेश देशमुख  वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली, हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला  भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं.

- Advertisement -

वडिलांची उणीव भासते : रितेश देशमुख

रितेश देशमुख वडिलांची आठवण काढत म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे, साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका घेतली. वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश म्हणाला की वडिलांची उणीव नेहमीच भासते, पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले.  काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेश देशमुखने काका दिलीपरावांबद्दलचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं.

- Advertisement -

‘आजोबा आणि वडिलांचे संस्कार पुढे चालवत आहोत’

विलासराव देशमुखांचा पुतळा अनावरणावेळी रितेश देशमुखने म्हटलं की, ‘या परिसरात असलेला हा पुतळा पाहून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली गेली पाहिजे. आपण जन्मापासून विविध भूमिका साकारत असतो. यात माणुसकी जपणारी लोकं हेच खरं भांडवल आहे. माझ्या आजोबांना त्याचा मुलगा मंत्री झाल्यावर कौतुक होते. मात्र, आजोबांना काही खटकलं की ते बोलत असत. विलासराव देशमुख यांना त्याच्या वडिलांनी एका पेपरची कटिंग दाखवत वैयक्तिक टीका करू नका, अशी शिकवण दिली. हे तेच संस्कार आहेत, याचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत.’

- Advertisement -

‘राजकारणात टीकास्त्र सुरू आहे, ते योग्य नाही’

‘आम्ही वैयक्तिक टीका करत नाही. आज राज्याच्या राजकारणात जे टीकास्त्र सुरू आहे ते योग्य नाही. विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर ते कारखाना वर आले. आजोबांच्या पाय पडले. त्यावेळी साहेब भावनिक झाले होते’, ही आठवणही त्यांनी बोलून दाखवली.

काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला पाहिजे

आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. थोडी फार उणीव नेहमीच भासते, पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. याच्यासाठी उभे राहिले की, आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि नसली तरीही मी आहे. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेशने दिलीपरावांसमोर आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केलं. काका आणि पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे, असंही रितेश देशमुख यांनी यावेळी म्हटलं.

 गांधी, पवार, ठाकरे यांच्याकडे सामान्यांना अपेक्षा : अमित देशमुख

अमित देशमुख यांनी यावेळी भाषणात म्हटलं की, विलासराव देशमुख यांचे नाव आठवलं तर निष्ठा हे समीकरण कायम आहे. ”मला तुम्ही काँग्रेसमधून काढून टाकलं तरी माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार”, हे विलासराव देशमुख म्हणायचे. मला ही विचारात आहेत, मात्र मी जेथे आहे, तेथे ठीक आहे. समाजाची नाळ तोडून इकडे-तिकडे जाणं अपेक्षित नाही. सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून सर्व जुन्या नेत्याचे दिवस पुन्हा आणू या. त्यासाठी सर्व सामान्य पर्यंत हे विचार पुन्हा पोहचविणे आवश्यक आहे.” गांधी, पवार, ठाकरे यांच्याकडून सामान्य माणूस पाहात आहेत, त्यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत. त्याची जबाबदारी आता येथील नेत्यावर आहे, असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

Share This Article