रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 21 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रवींद्र वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जोगेश्वरीतील आरक्षित जागेवर परवानगी न घेता रवींद्र वायकर यांनी अवैधरित्या बांधकाम करून हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वायकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरेंसाठी धक्का असेल. पक्ष बदलण्यासाठी रवींद्र वायकर यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचा दावाही ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांत वारंवार केला.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आमदार वायकर यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली होती. ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, अशी वायकर यांची द्विधा मनस्थिती झालेली होती. तशा भावना त्यांनी काही पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्या होत्या. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या मनाने शिवसेना शिंदे गटाच्या बाजूले कौल दिल्याने आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडेल, अशी माहिती आहे.

- Advertisement -

फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी प्रकरणात रवींद्र वायकर यांना अटकेची भीती होती. मी कोणताही गैरव्यवहार केला नाहीये परंतु तरीही राजकीय आकसापोटी माझ्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लागलेले आहे, अशा भावना त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवल्या होत्या. पण लोकसभेआधी हा पक्षप्रवेश होणे सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने अखेर आज सायंकाळी त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे.

- Advertisement -

Share This Article