राहुल गांधींनी पँगॉन्गमध्ये मोदी सरकारला घेरलं

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 32 Views 2 Min Read
2 Min Read
Highlights
  • पंतप्रधान खरं लपवतायत, चीननं आपली जमीन बळकावलीये

काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी लडाखमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “लडाखच्या लोकांनी मला सांगितलं आहे की, चिनी सैन्य इथे घुसलंय. त्यांना तिथे जाता येत नाही, जी पूर्वी त्यांची चरायची जमीन होती. लडाखमध्ये प्रत्येकजण हेच म्हणत आहेत. एक इंचही जमीन गेलेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले आहेत, पण ते खरं नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारा, सगळे तुम्हाला सांगतील.”

- Advertisement -

राहुल गांधी म्हणाले की, “लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे, त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवं आहे आणि इथे अनेक बेरोजगारीची समस्या आहेत. नोकरशाहीनं नव्हे तर जनतेच्या आवाजानं राज्य चालवलं पाहिजं, असं लोक म्हणत आहेत.”

- Advertisement -

राहुल गांधी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 77व्या जयंतीनिमित्त लडाखला पोहोचले होते. पॅंगॉन्ग त्सो तलाव येथे राहुल यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेच्या वेळी लडाखला यायचं होतं, मात्र लॉजिस्टिकल कारणास्तव तिथे जाऊ शकलो नाही, असं सांगितलं. मग लडाखचा दौरा सविस्तरपणे करू असा विचार केला. राहुल गांधी म्हणाले की, ते लेहला गेले होते आणि पॅंगॉन्ग नंतर आता नुब्राला जात आहेत. यानंतर आम्ही कारगिललाही जाणार आहोत. लोकांच्या मनात काय आहे, ते ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे.

- Advertisement -

पप्पा, तुमची स्वप्नंच माझं ध्येय : राहुल गांधी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या वडिलांचं स्मरण करताना राहुल गांधींनी लिहिलं की, “पप्पा, तुमच्या डोळ्यांत भारतासाठी जी स्वप्नं होती, ती या अनमोल आठवणींमधून दिसतायत. तुमची स्वप्न हाच माझा मार्ग आहे – प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्न समजून घेतोय, भारत मातेचा आवाज ऐकतोय.”

Share This Article