पं. जगताप गुरूजी पं. पलुस्कर संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 45 Views 1 Min Read
1 Min Read

अखिल भारतीय गांधर्व मंडळ, मुंबईच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्काराने लातूर येथील गुरूवर्य पं. विठ्ठलराव जगताप यांना पद्मश्री पुरू दाधिच यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभास अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे अध्यक्ष पं. बालासाहेब सूर्यवंशी तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दशकांपासून लातूरच्या सांगीतीक घडामोडीमध्ये अनेक विद्यार्थी घडवून पं. विठ्ठलराव जगताप यांनी संगीत प्रचार व प्रसाराचे कार्य आजतागायत सुरू ठेवले

- Advertisement -

आहे. गंज गोलाईमध्ये जगदंबेच्या गाभा-यात गुरूवार संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून व एक संगीत अध्यापक या नात्याने श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात लातूरच्या हजारो विद्यार्थ्यांना संगीत ज्ञानार्जन करून संगीत विषयात एक आगळावेगळा लातूर पॅटर्न त्यांनी तयार केला. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर व पं. के. एन. बोळंगे गुरूजी यांचा वसा आणि वारसा पं. विठ्ठलराव जगताप यांनी जपला आहे. पं. विठ्ठलराव जगताप यांचा गौरव झाल्याबद्दल त्यांचे समाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article