दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 26 Views 2 Min Read
2 Min Read

1993 मधील मुंबई सिरिअल ब्लास्टचा (Mumbai Serial Blast) मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतील (Karachi) एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मिडियाद्वारे कळते आहे. मात्र यासंदर्भात भारत (India) किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही. मात्र ही बातमी सत्य असल्याची शक्यता एवढ्यासाठी बळावते आहे कारण कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमधे इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक यूजर्सकडून केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं पुष्टी केली की, गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे, त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आलं आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे, दाऊदवर खरंच विषप्रयोग झालाय का? याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानात इंटरनेट बंद

दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याची बातमी आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही सर्व्हर डाऊन आहेत. याशिवाय ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम देखील काम करत नाहीत, असा दावा केला जात आहे.

नेटब्लॉक या जगभरातील इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि डिजिटल गव्हर्नन्सवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेनं पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याची पुष्टी केली आहे.

Share This Article