परभणी जिल्हा गारठला, तापमान 10.08 अंशावर

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 18 Views 1 Min Read
1 Min Read

परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासुन थंडीची लाट पसरली असुन कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठलाय.सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे तापमान 10.08 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे.

- Advertisement -

गारवा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा

डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत नव्हता, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात तापमानात घट झाली आसून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आसून तापमान 15 अंश पर्यंत खाली आले आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार आसून पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र थंडीचा कडाका वाढला आसून थंडी पासून बचावासाठी नागरिकांना शकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

- Advertisement -

विदर्भात थंडीची लाट

विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून दक्षिण भारतात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नाताळनंतर काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात घट होईल.

- Advertisement -

Share This Article