पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला धक्का!

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 20 Views 2 Min Read
2 Min Read

मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धा जवळपास आता अर्ध्यावर आली असून उर्वरित सामन्यात सेमी फायनलमधील मधील संघ निश्चित होतील. शुक्रवारी झालेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधील अटीतटीच्या सामन्यामध्ये आफ्रिकेने विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने पॉईंट टेबलमध्ये गगनभरारी घेतली असून पाकिस्तान संघाच्या पराभवाचा भारताला मोठा फटका बसला आहे. आता सेमी फायनलमधील चार संघासाठीची चुरस आणखी वाढणार आहे.

- Advertisement -

पाकिस्तान संघाचा शुक्रवारी झालेल्या सामन्यात पराभव झाल्याने भारतीय संघाचं नुकसान झालं आहे. दक्षिण आफ्रिका संघाने या विजयासह पॉईंट टेबलमध्ये भरारी घेत अग्रस्थान पटकावलं आहे. यामुळे भारताची आता दुसऱ्या स्थानी घसरण झालीये. भारत आणि आफ्रिकेचे 10 असे समान गुण आहेत मात्र नेट रनरनेट जास्त असल्याने आफ्रिका अग्रस्थानी गेली आहे.  पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर आफ्रिका एक नंबरला गेली  नसती. आफ्रिकेने नेदरलँडविरूद्धचा सामना सोडला तर सर्व सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.

- Advertisement -
संघ सामने विजय पराभव गुण रनरेट
दक्षिण अफ्रिका 6 5 1 10 +2.032
टीम इंडिया 5 5 0 10 +1.353
न्यूझीलंड 5 4 1 8 +1.481
ऑस्ट्रेलिया 5 3 2 6 +1.142
श्रीलंका 5 2 3 4 -0.205
पाकिस्तान 6 2 4 4 -0.387
अफगाणिस्तान 5 2 3 4 -0.969
बांगलादेश 5 1 4 2 -1.253
इंग्लंड 5 1 4 2 -1.634
नेदरलँड 5 1 4 2 -1.902`

शुक्रवारी झालेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यामध्ये सर्वबाद 270 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाकडून शकील 52 धावा आणि बाबर आझम 50 धावा यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाची दमछाक झालेली पाहायला मिळाली. शेवटपर्यंत गेलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव झाला. वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचं जवळपास पॅकअप झाल्यात जमा आहे.

- Advertisement -

Share This Article