चांद्रयान 3 च्या लॅण्डिंगला उरले अवघे काही तास

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 22 Views 3 Min Read
3 Min Read

इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे नवीन फोटो ट्विट करण्यात आला आहे. लँडर मोड्युलला खाली उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. तिथून पुढे 20 मिनिटांनी टच डाऊन होणं अपेक्षित आहे.  त्यादिशेने विक्रम लँडरच्या सगळ्या सिस्टीम उत्तम पद्धतीनं काम करतायत अशी माहिती इस्रोनं दिली आहे.

- Advertisement -

चांद्रयान-3 लॅण्डिंगचे चार टप्पे

  • चंद्राच्या पृष्ठभागापासून  लॅण्डरची उंची 800 मीटर ते 1300 मीटर असेल
  • विक्रमचे सेन्सर्स कार्यान्वित  होतील आणि त्याची उंची मोजली जाईल
  • पुढच्या 131 सेकंदात लॅण्डर पृष्ठभागापासून 150 मीटरवर येईल
  • लॅण्डवरचा धोका शोधक  कॅमेरा पृष्ठभागाच्या प्रतिमा कॅप्चर करेल
  • विक्रमवर बसवलेला  धोका शोधणारा  कॅमेरा रन करेल
  • प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम 73 सेकंदात चंद्रावर उतरेल
  • जर नो- गो अट असेल तर 150 मीटर पुढे जाऊन थांबेल
  • पुन्हा पृष्ठभाग तपासेल  आणि सर्व ठीक असेल तर लॅण्ड होईल

सोलापुरात चंद्रयान मोहीमेसाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरला  महारुद्राभिषेक

सोलापुरात भाजपाकडून चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरकडे साकडे घालण्यात आले आहे.  महारुद्राभिषेक करत मोहीम यशस्वी करण्यासाठी सिद्धरामेश्वरांच्या चरणी  प्रार्थना केली.  भाजपा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य सोलापूरकर उपस्थित आहे. भारतीय शास्त्रज्ञाकडून चंद्राच्या दक्षिण दिशेला हे यान उतरवण्यात येणार आहे.चांद्रयानच्या या मोहिमेला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत त्यामुळे  ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी आम्ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना साकडे घातले, अशी प्रतिक्रिया सोलापूरकरांनी दिली आहे.

- Advertisement -

ओडिशातील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांच्याकडून इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहे.  चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी वाळू शिल्पातून शुभेच्छा दिल्या

- Advertisement -

सायंकाळी 6.04 वाजता ‘चांद्रयान-3’च्या लँडरची सॉफ्ट लँडिंग होऊ शकली नाही. तर ती किमान चार दिवसांनी पुढे ढकलावी लागेल. मात्र, सॉफ्ट लँडिंग 6.04 वाजता होणार की नाही याचा निर्णय दोन तास आधी जेव्हा अखेरची डीबूस्टिंग सुरू होईल, तेव्हाच घ्यावा लागणार असल्याचे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले.  एकदा अखेरची डीबूस्टिंग सुरू करताना सॉफ्ट लँडिंग 6.04 वाजता करण्याचा निर्णय घेतला. तर ती 6.04 वाजताच करावी लागणार आहे. 

चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण

भारत अवघ्या काही तासांमध्ये इतिहास रचणार आहे. भारत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. घरबसल्यास आपल्या सर्वांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता येणार आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. लँडिंग ऑपरेशन्सचं लाईव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAC कडून 23 ऑगस्ट रोजू 17:20 वाजता सुरू होणार आहे.

Share This Article